पंजाबमधील काँग्रेसचे सगळे आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतलेले ! – अमरिंदर सिंह
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आमदारांची नावे सांगण्यास नकार
|
चंडीगड – पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत; मात्र आपण कुणाचीही नावे सार्वजनिक करणार नाही. ‘कोण सहभागी आहे ?’ याऐवजी ‘कोण सहभागी नाही ?’ हे विचारा. मी नावे सांगायला प्रारंभ केला, तर वरून चालू करावे लागेल. मला ते करायचे नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.
Amarinder Singh says a bulk of Congress Punjab MLAs are involved in illegal sand mining https://t.co/wrIIK0QrS8
— Republic (@republic) November 2, 2021
यापूर्वीच अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले होते, आपल्या पक्षाचे अनेक आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतल्याचे अहवाल त्यांच्याकडे आहेत.’ (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना याविषयी ठाऊक होते आणि त्यांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणतीही कृती केली नाही, यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) पंजाब विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. (मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही ? – संपादक)