जालना (जिल्हा संभाजीनगर) येथील प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल यांचा राज्यपालांकडून सन्मान !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांसाठी विशेष कार्य केल्याविषयी त्यांचा सन्मान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सन्मान स्वीकारतांना डावीकडून श्री. घनश्यामदास गोयल

संभाजीनगर, २२ डिसेंबर (वार्ता) – जालना येथील प्रसिद्ध उद्योजक ‘कालिका स्टील’ समूहाचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते श्री. घनश्यामदास गोयल यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सत्कार करून त्यांना सन्मानित केले. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांसाठी विशेष कार्य केल्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात श्री. गोयल यांनी रुग्णांसाठी ‘अन्नामृत फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांच्यासाठी कोविड हॉस्पिटल परिसरात २४ घंटे अन्नछत्र उघडून मोठ्या प्रमाणात अन्नदान केले. ‘अन्नामृत फाउंडेशन’च्या माध्यमातून या रुग्णांना साहाय्याचा हात देण्यात श्री. गोयल यांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित झाल्याबद्दल श्री. गोयल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री. घनश्यामदास गोयल यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विविध उपक्रमांत नेहमीच मोठा सहभाग असतो. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. घनश्यामदासजी गोयल यांचे विशेष अभिनंदन !