लोकशाही स्थिर करण्यासाठी पैशांचा अपवापर थांबवा !
‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल. अनेक जण पैसे घेऊन मतदानासही जात नाहीत. पैशाविना मतदान होणे, हे मतदारास विचार करण्यासारखे होईल. लोकशाहीत जर चांगल्या मार्गाने स्थिर व्हायचे असेल, तर काळ्या पैशांचा होणारा वापर थांबवलाच पाहिजे. तसेच प्रत्येक राजकीय पुढार्याची संपत्ती ही कायमस्वरूपी तपासणे आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराची संपत्ती आज १ कोटी असेल आणि ५ वर्षांनी ती १०० कोटी होते. याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. या अवधीत त्याने खाल्लेले (भ्रष्टाचाराने कमावलेले) पैसे शासनाधीन करणे आवश्यक आहे, तरच लोकशाही सुधारेल !’
– अनुराधा मेहेंदळे (साभार : ‘लोकजागर’, १७ नोव्हेंबर २०१७)