सतत व्यस्त असूनही व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७३ वर्षे) !
‘पू. माईंकडून (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्याकडून) शिकण्यासारखे पुष्कळ आहे. त्या म्हणजे दैवी गुणांचा खजिनाच आहेत.
१. सर्वांचे आदरातिथ्य प्रेमाने करणे
पू. माईंकडे सतत साधक आणि त्यांचे नातेवाईक यांचे येणे-जाणे चालू असते. त्यामुळे त्या सतत व्यस्त असतात; पण तरीही पू. माईंचे सर्वांकडे अगदी बारीक लक्ष असते. ‘चहा-पाणी, अल्पाहार आणि जेवण घेतले ना ?’, असे त्या प्रत्येकाला विचारतात.
२. इतरांना प्रार्थनेची आठवण करून देणे
एवढ्या व्यस्ततेतही त्या त्यांची व्यष्टी साधनाही तेवढ्याच गांभीर्याने करतात. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुणी प्रार्थना करायला विसरले, तर पू. माई त्यांना ‘प्रार्थनेची वेळ झाली. चला या. प्रार्थना करूया’, असे सांगून प्रार्थनेची आठवण करून देतात.
३. व्यष्टी साधना पूर्ण करूनच झोपणे
पू. माई रात्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचे वाचन करतात. सर्व जण झोपल्यानंतर पू. माई नामजप किंवा वाचन हे सर्व पूर्ण करूनच झोपतात आणि तरीही त्या सकाळी सर्वांच्या आधी उठतात.’
– सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल (१८.१२.२०२१)
(‘प.पू. दास महाराज यांचे खडतर बालपण आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीमाता या विरागी दांपत्याने त्यांचा केलेला सांभाळ !’ या लेखाचा क्रमशः भाग आज जागेअभावी प्रसिद्ध करू शकलो नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. – संपादक)