पाकमधून ७ सहस्र नागरिकांचा भारताची नागरिकता मिळण्यासाठी अर्ज ! – केंद्र सरकारची माहिती

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय

नवी देहली – वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जांमध्ये सर्वाधिक ७ सहस्र ३०६ अर्ज पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात आले आहेत, तर १ सहस्र १५२ अर्ज अफगाणी नागरिकांनी केले आहेत, अशी माहिती राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.

राय यांनी सांगितले की, वर्ष २०१८ ते २०२१ या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू, शीख, जैन अन् ख्रिस्ती अल्पसंख्यांकांनी भारताची नागरिकता मिळण्यासाठी ८ सहस्र २४४ अर्ज केले होते. त्यातील ३ सहस्र ११७ जणांना नागरिकता देण्यात आली आहे.