लोकसंख्या नियंत्रण कायदा करा अन्यथा हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही !
डॉ. प्रवीण तोगाडिया यांची भाजप सरकारकडे मागणी
हरिद्वार (उत्तराखंड) – केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर केला पाहिजे. असे न केल्यास त्याला हिंदुत्वावर बोलण्याचाही अधिकार नाही, असे विधान आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केले आहे. तसेच तबलिगी जमातवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली.
हरिद्वार पहुंचे प्रवीण तोगड़िया ने उठाए केंद्र और संघ पर गंभीर सवाल, जानिए क्या कहा#Haridwar #PraveenTogadia #RSS #BJPhttps://t.co/Hg3liG4Bi7
— ABP News (@ABPNews) December 22, 2021
केवळ हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे सरकारीकरण का ?
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांचे सरकारीकरण केले जात नाही; हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का होत आहे ? असा प्रश्न डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी उपस्थित केला. ‘वर्ष २०१७ मध्ये भोपाळ येथे मला श्रीराममंदिराच्या सूत्रावर बोलण्यापासून रा.स्व. संघाच्या नेत्यांनी रोखल्याने मी नाइलाजाने विहिंपच सोडली’, असेही डॉ. तोगाडिया म्हणाले.