पाकमध्ये सत्र न्यायालयाच्या आवारातून दिवसाढवळ्या हिंदु महिलेचे अपहरण
पाकमधील हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी भारत सरकार कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो ! – संपादक
नवी देहली – पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोटच्या सत्र न्यायालयाबाहेर एका हिंदु महिलेला दिवसाढवळ्या सर्वांसमोरून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ भाजपचे नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी ट्विटरवर ट्वीट करत प्रसारित केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना ‘मेंशन’ही (संबंधित व्यक्तीला उद्देशून) केले आहे.
–@DrSjaishankar Ji India is the only hope for minorities in Pak as @ImranKhanPTI Ji is doing nothing for minorities’ safety
Video Courtesy:Shiva Kacchi @USCIRF@ANI @republic @htTweets @TimesNow @thetribunechd @punjabkesari https://t.co/inUHlrYL7j— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) December 21, 2021
या महिलेचे होत असतांना ती उपस्थित लोकांकडे साहाय्याची मागणी करत होती. तरीसुद्धा कुणीही तिच्या साहाय्यासाठी धावून जात नव्हते, असे संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे.