स्वयंपाकघरातील सेवेचे महत्त्व !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे, आपण स्वतःला विसरून इतरांचा विचार करू लागतो. त्यातून अहं अल्प होतो आणि प्रेमभाव वाढतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०२१)