कुटुंबात भांडणे-मतभेद होऊ नयेत, यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी
१. आपली मुलगी जेवढ्या वेळेस माहेरी येते, तेवढीच संधी आपल्या सूनेस माहेरी जाण्यास द्यावी.
२. नववधूने आपल्या माहेरची गार्हाणी सासरी सांगू नयेत.
३. मुलांच्या गुणांचे चारचौघांत कौतुक करा; परंतु एकदा चूक झाल्यास चारचौघांत मानहानी, अपमान किंवा मारहाण करू नका.
४. अनुकरण करणे, हा मुलांचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे त्यांच्या समोर मोठ्या माणसांनी घरात किंवा नातेवाइकांसमवेत भांडणे करू नयेत. खरेदी-विक्री करतांना शक्यतो मुलांना समवेत घेऊन जावे. दुकानदारासमवेत कसे बोलावे ? पैशांचा व्यवहार कसा करावा ? याचे शिक्षण द्यावे.
५. वेळेचे महत्त्व सर्वत्र आहे. मुलांना शाळा, छंदवर्गात वेळेवर पाठवा आणि वेळेवर परत येण्याची सवय लावा. वेळेचा सदुपयोग करण्याचे शिक्षण द्या.
६. घरचा अभ्यास करण्याची सवय मुलांना लावा.
७. शाळेत काय घडले ? त्याची अधून-मधून चौकशी करा.
(साभार : मासिक ‘अक्कलकोट स्वामी दर्शन’)