राजकीय शुद्धतेसाठी पुढार्यांवरील खटल्यांची सुनावणी वर्षभरात पूर्ण करण्यात यावी !
‘आज संपूर्ण देशामध्ये अनेक राजकीय लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. अनेकांवर खून, दरोडे असेही आरोप आहेत. बेहिशोबी संपत्तीचे आरोप तर अनेकांवर आहेत. अशा सर्व आमदार-खासदारांच्या खटल्यांची सुनावणी एका वर्षभरात पूर्ण करण्यात यावी, म्हणजे राजकीय शुद्धता निश्चित येऊ शकेल !’
(अशी मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे. खून, दरोडे यांसारखे गंभीर आरोप असलेले लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ? राजकीय शुद्धता येण्यासाठी निःस्वार्थी शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – संपादक)
– अशोक पाटील (साभार : ‘लोकजागर’, १७ नोव्हेंबर २०१७)