कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची एस्.टी. संपातून माघार !
मुंबई – महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप मागे घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी दिली. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमवेत बैठक घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे; परंतु अन्य कर्मचार्यांनी महामंडळात विलिनीकरण झाल्याविना संप मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.