केंद्र सरकारच्या आदेशानंतर यू ट्यूबवरून प्रसारित होणार्या भारतविरोधी २० वाहिन्या आणि २ संकेतस्थळे यांच्यावर बंदी !
नवी देहली – ‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारत सरकारच्या आदेशानंतर भारतविरोधी विचार पसरवणार्या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
We’ve taken action against websites spreading anti-India propaganda&fake news. Youtube channels & websites belong to a coordinated disinformation network operating from Pak & spreading fake news about various sensitive subjects related to India: Union I&B Minister Anurag Thakur pic.twitter.com/y1Yzii8pVe
— ANI (@ANI) December 21, 2021
यू ट्यूबवरून प्रसारित होणार्या या २० वाहिन्या पाकिस्तानमधून चालवण्यात येत होत्या. त्यांच्यासहित २ संकेतस्थळांवरही बंदी घालण्यात आली आहे. ही संकेतस्थळेही पाकमधून संचालित होत होती. या वाहिन्यांचे २० लाख सदस्य होते. या वाहिन्यांवरून भारतातील ३ कृषी कायदे, श्रीराममंदिर, काश्मीर आदी प्रकरणांविषयी खोट्या बातम्या प्रसारित करण्यात येत होत्या.