तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात (जिल्हा कोल्हापूर) शिक्षकांसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रवचन !
नवेपारगाव (जिल्हा कोल्हापूर), २० डिसेंबर (वार्ता.) – येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात शिक्षकांसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ६१ टक्के पातळी असलेल्या आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनी प्रवचन घेतले. प्रवचनात दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगून त्यांनी उपस्थितांकडून सामूहिक नामजप करवून घेतला. नियमित नामजप आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व त्यांनी या वेळी सांगितले. नामजप केल्यावर अनेक शिक्षकांनी चांगले वाटल्याचे सांगितले.