नवी मुंबईत टाटा समूहाची ५ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक !
नवी मुंबई – टाटा आस्थापनाद्वारे ५ सहस्र कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करून ७० सहस्र जणांना रोजगार देणार्या टाटा रिॲलिटीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कचे भूमीपूजन नवी मुंबईत करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हे भूमीपूजन करण्यात आले.