आगामी आपत्काळात स्मितहास्यासह प्रसन्न चेहरा, हा दुःखी लोकांसाठी पहिला प्रथमोपचार असेल !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘पुढील आपत्काळात लोकांना पुष्कळ शारीरिक आणि मानसिक दुःखांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये ज्यांची साधना नसेल, ते मनाने खचून जातील. अशा लोकांवर बाह्यतः कितीही उपचार केले, तरी ते मनाला आधार किंवा उभारी देणारे नसतील. त्या वेळी त्यांच्या समोर येणार्या व्यक्तीचा प्रसन्न चेहरा आणि त्याचे स्मितहास्यच त्यांच्या मनाला आधार अन् उभारी देणारे असेल. तो त्यांच्या मनासाठीचा प्रथमोपचार असेल. यासाठी साधकांनो, आतापासूनच स्मितहास्यासह चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.११.२०२१)