वाल्हेकरवाडी (पिंपरी) येथील रुग्णालय इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी
पिंपरी (पुणे) – महापालिकेची वाल्हेकरवाडी सेक्टर ३२ येथील रुग्णालय आणि व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित अन् धोकादायक आहे. ती तात्काळ पाडण्यात यावी, असा अहवाल २१ एप्रिल २०१६ या दिवशी झालेल्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ नंतर महापालिकेला दिला होता. त्यामुळे तेथील रुग्णालय आणि व्यायामशाळा असलेली इमारत कोसळण्यापूर्वी इतरत्र स्थलांतरीत करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी महापालिकेकडे केली आहे.