स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही काळाची आवश्यकता !
‘स्त्रीभ्रूण हत्या ही समाजाला लागलेली कीड आहे. केवळ गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात बंदी करून हे थांबणार नाही किंवा मुलगी ही दोन्ही घरचा दिवा म्हणून तिच्याकडे पहाणे, तेही तितकेसे योग्य नाही.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रामुख्याने करावयाच्या कृती !
१. स्त्री जगवली, तर ती जगेल. यामध्ये स्त्रीची मानसिकता पालटायला हवी. मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तरी स्त्रीभ्रूण हत्या थांबवायला हवी. त्यासाठीची मानसिकता कुटुंबातून संस्कारित करणे आवश्यक आहे.
२. आधुनिक विचार स्वीकारणार्या समाजाला नीतीमूल्ये, संस्कृति आणि एकत्र कुटुंबपद्धती यांचे महत्त्व पटवून द्यायला हवे.’
– श्री. ठाकूर बी. एन्. (साभार : साप्ताहिक ‘पनवेल नगरी’, दिवाळी विशेषांक २०१५)