तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना एवढा मोठा घोटाळा शक्य नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर – राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याविना ‘टीईटी’ परीक्षेसारखा एवढा मोठा घोटाळा शक्य नाही. परीक्षा रहित झाल्याने विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोक लुटारू सत्ताधार्यांसमवेत त्यांचे खिसे भरत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सखोल अन्वेषण झाले पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करायची आणि दुसरीकडे लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळायचे असा प्रकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून चालू आहे.’’