सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालय यांना निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
सांगली, २० डिसेंबर (वार्ता.) – २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी या निमित्ताने मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
कवठेमहांकाळ
१. कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून जावेद बोजगर यांना निवेदन देण्यात आले.
२. महिला विद्यालयाचे प्राचार्य एम्.एस्. सातपुते यांना निवेदन देण्यात आले. या महाविद्यालयात ५५० विद्यार्थिनी शिकत असून प्राचार्यांनी विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाची मागणी केली आहे.
श्री महांकाली हायस्कूल येथे ‘ऑफीस सुपरवायझर’ श्री. माने यांनी निवेदन स्वीकारले. पद्यभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ येथे प्राचार्य एम्.के. पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. गाडे आणि श्री. कोष्टी उपस्थित होते.
या वेळी धर्मप्रेमी श्री. अक्षय वडर आणि श्री. राकेश पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष देसाई, वैभव भोसले, महेश क्षीरसागर, संतोष चव्हाण उपस्थित होते.
बोरगाव-ईश्वरपूर
१. कन्या महाविद्यालयाच्या मुख्याधापिका सौ. कुंभार यांना धर्मप्रेमी सौ. उलका पाटील यांनी निवेदन दिले. या दोन्ही महाविद्यालयातील मुख्याध्यापिकांनी ‘सदरचे निवेदन शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेत वाचून दाखवते’, असे सांगितले.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथील मुख्याध्यापिका सौ. विजया हणमंत हिरवे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. मंगल खोत, धर्मप्रेमी सौ. वंदना देसाई उपस्थित होत्या.
२. बोरगाव-ईश्वरपूर येथील ‘ओंकार क्लास’मध्ये सौ. शुभांगी महामुनी यांना निवेदन देण्यात आले.
३. रेठरेहरणाक्ष येथे सरंपच श्री. कुमार कांबळे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच श्री. कांबळे यांनी ‘सदरचे निवेदन ग्रामपंचायत फलकावर लावतो’, असे सांगितले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. सुरेखा पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार आणि धर्मप्रेमी सौ. सुरेखा कुंभार उपस्थित होत्या.