श्रीलंकेच्या नौदलाकडून गेल्या २ दिवसांत ५५ भारतीय मासेमार्यांना अटक आणि ८ नौका जप्त
श्रीलंकेच्या सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारत सरकारने भारतीय मासेमार्यांना भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती होण्यासाठी तेथे दर्शक लावणे आवश्यक आहे. ते न केल्याने मासेमार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ! – संपादक
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने १२ भारतीय मासेमार्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या २ नौकाही जप्त केल्या आहेत. ‘श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये ते मासेमारी करत होते’, असा नौदलाने आरोप केला आहे. गेल्या २ दिवसांत श्रीलंकेच्या नौदलाने एकूण ५५ भारतीय मासेमार्यांना अटक केली असून एकूण ८ नौका जप्त केल्या आहेत.
55 TN fishermen held, 8 boats seized by SL Navy; CM urges Centre to act https://t.co/x0lAujFgWk
— Hindustan Times (@HindustanTimes) December 19, 2021