पुणे येथील ‘विश्व श्रीराम सेने’चे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल !
पुणे – ‘विश्व श्रीराम सेना’ ही सामाजिक कार्य करणारी संस्था असून, या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लालबाबू गुप्ता यांना नवी देहली येथे झालेल्या एका दीक्षांत समारंभात विद्यापिठाच्या वतीने ‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ द किंगडम ऑफ टेंगा’कडून उच्च सन्मानाची ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल ही पदवी देण्यात आली.
अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी ‘विश्व श्रीराम सेना’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला, तरच सामाजिक विकास शक्य आहे. गरिबांचे जीवनमान सुधारावे यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला जो सन्मान मिळाला आहे, त्यातून कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असून ‘राष्ट्रीय एकता’ आणि ‘राष्ट्र विकास’ हे आमचे ध्येय असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.