साश्रू नयने अर्पितो आपणांस कृतज्ञतेसह श्रद्धांजली ।
भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा निधनानंतरचा बारावा दिवस २० डिसेंबर २०२१ या दिवशी आहे. त्यानिमित्ताने कोलगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. दत्तात्रय पटवर्धन यांनी जनरल बिपीन रावत यांना वाहिलेली सुमनांजली येथे देत आहोत.
भारतीय सैन्यदलाचे प्रमुख पहिले । आदरणीय आपण जनरल बिपीन रावत ।
भारतीय सैन्यासाठी होता । आदर्श मार्गदर्शक जणू पितृवत् ।। १ ।।
अपघाती निधन पत्नीसह अपुले । ज्याने भारतीय सारे शोकाकुल झाले ।
पंतप्रधानांसह सारे शासन अतीव हळहळले । समस्त राष्ट्र या दुर्घटनेने प्रचंड हादरले ।। २ ।।
अनपेक्षित अपघाती निधन अपुले । बरेच काही सांगून गेले ।
अंतर्बाह्य शत्रूंचे जाळे । कसे, कुठे, किती आहे पसरले ।। ३ ।।
सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी । मृत्यूनंतर अपुल्या उद्गारले लक्षवेधी ।
सूचक, सतर्क तथा गगनभेदी । हितशत्रूंच्या विनाशाची ठरेल ही नांदी ।। ४ ।।
असंख्य वीर बिपीन होतील । आपल्या अदृश्य सूक्ष्म प्रेरणेतून ।
अतुल, अपूर्व, अजिंक्य भारत । साकारेल अपुल्या बलीदानातून ।। ५ ।।
आपल्यासह भारतमातेचे अन्य वीर सुपुत्र । मृत्यू पावले अपघाती अवचित वाटते षड्यंत्र ।
भारतमातेच्या दुष्ट शत्रूंचा विनाश काळ आला जवळी । साश्रू नयने अर्पितो आपणांस कृतज्ञतेसह श्रद्धांजली ।। ६।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, सिंधुदुर्ग (१३.१२.२०२१)