गोवंशियांच्या हाडांपासून तेल आणि पावडर सिद्ध करणार्या कारखान्यावर पोलिसांची धाड !
दोन धर्मांधांवर गुन्हा नोंद
सोलापूर – शहरात तुळजापूर रस्त्यावर महापालिकेच्या कचरा डेपोलगत मेलेल्या गोवंशियांचे मांस आणि हाडे यांपासून तुपासारख्या बनावट तेलजन्य पदार्थाची निर्मिती करणार्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. या ठिकाणी मांस आणि हाडे यांची भुकटी करून लोखंडी कढईत ते वितळवण्यात येत होते. या कारखान्यासाठी महावितरणची अनुमती घेतलेली नव्हती, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम मोडले होते. त्यामुळे या प्रकरणी ‘ट्रिपल ट्रेडिंग’ आस्थापनाचे इमरान अब्दुल मजीद कुरेशी, ‘वसी इंटरप्रायजेस’चे अलीम अब्दुल मजीद कुरेशी या दोघांविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील ४ वर्षांपासून हा प्रकार चालू होता. यामध्ये गोवंशियांच्या अवयवांपासून तेलसदृश द्रव आणि तूपसदृश पदार्थ सिद्ध करण्यात येत होते. या कारखान्यात बनवण्यात आलेले तेल कुठे नेले होते ? आदी गोष्टींची पडताळणी करण्यात येत आहे. (पोलिसांनी योग्य अन्वेषण करून धर्मांधांच्या या कृतीचा छडा लावावा, हीच सामान्य जनतेची अपेक्षा. – संपादक)