धर्मांतरविरोधी कायद्यासाठी विहिंपचे २१ डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन

मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार (मध्यभागी)

नवी देहली – विश्‍व हिंदु परिषद २१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत देशभरात धर्मांतरविरोधी आंदोलन करणार आहे.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात आम्ही यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांची भेट घेतली. आतापर्यंत ३२९ खासदारांना भेट घेतली असून यांत मुसलमान आणि ख्रिस्ती खासदारांचाही समावेश आहे. जर आदिवासी धर्मांतर करत असेल, तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळू नये. यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. आमीष, भीती आणि फसवणूक यांद्वारे धर्मांतर करणार्‍यांना या कायद्याद्वारे कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.