पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराचा प्रसाद देण्यासाठी सिगारेटच्या वेष्टनाचा वापर !

एरव्ही भारताच्या विरोधात गरळओक करणारे खलिस्तानवादी पाकिस्तानातील या कृत्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून ‘खलिस्तानवाद्यांना जिहादी पाककडून शीख पंथाचा द्वेष केलेला चालतो’, असे म्हणायचे का ? – संपादक

पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराचा प्रसाद देण्यासाठी सिगारेटच्या वेष्टनाचा वापर

नवी देहली – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या ‘कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिब’चा प्रसाद देण्यासाठी सिगारेटच्या वेष्टनाचा वापर करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका भक्ताने प्रसादाचे वेष्टन काढल्यावर त्याच्या आतल्या बाजूला ‘गोल्ड स्ट्रीट इंटरनॅशनल’ नावाच्या सिगारेटच्या आस्थापनाचे विज्ञापन छापले असल्याचे लक्षात आले. शीख पंथानुसार सिगारेट, तंबाखू यांसारख्या पदार्थांना निषिद्ध मानले जाते. यामुळे या घटनेवर शीख समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

याविरोधात ‘देहली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष आणि भाजपचे नेते मजिंदरसिंह सिरसा यांनी ट्वीट करून या कृत्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानात शिखांच्या धार्मिक भावना वारंवार दुखावल्या जात आहेत. या माध्यमातून शिखांच्या विरोधात राबवण्यात येणार्‍या षड्यंत्राचा संशय येतो.’’

‘देहली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष आणि भाजपचे नेते मजिंदरसिंह सिरसा

गेल्याच मासात ‘कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिब’च्या परिसरामध्ये मस्तकावर कोणतेच कापड नसतांना एका ‘मॉडेल’ची (कलाकाराची) अनेक छायाचित्रे ‘मन्नत’ या कपडे विकणार्‍या ऑनलाईन पाकिस्तानी आस्थापनाकडून सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आली होती. शीख धर्मानुसार गुरुद्वारामध्ये डोक्यावर कापड घेऊनच दर्शन घेण्याची परंपरा राहिली आहे.