उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ !

  • महंमद पैगंबर यांचे विडंबन झाल्याचे प्रकरण

  • पोलीस ठाण्यावरही मोठ्या प्रमाणात दगडफेक

महाराष्ट्रात धर्मांधांचा वाढता उन्माद ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) – सामाजिक संकेतस्थळावरील एका पोस्टद्वारे महंमद पैगंबर यांचे विडंबन झाल्याच्या प्रकरणावरून १७ डिसेंबर या दिवशी येथे धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. धर्मांधांनी दुचाकी, तसेच चारचाकी वाहने आणि व्यापारी संकुले अन् काही घरे यांच्यावरही आक्रमण केले. जवळच्या पोलीस ठाण्यावरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. (धर्मांधांच्या या कृतीतून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचेच दिसून येते ! – संपादक) काही घरे आणि दुकाने यांना आग लावण्यात आली. त्यामुळे शेवटी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. या वेळी धर्मांधांनी एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते.

काही वृत्तवाहिन्यांनी या घटनांचे वृत्तांकन करून ते प्रसारित केले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ ‘युट्यूब’द्वारे प्रसारित झाल्यावर त्यांच्या खाली धर्मांधांनी भडकाऊ स्वरूपाची विधाने करत आपापली मते (कमेंट्स) व्यक्त केली आहेत. (‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! – संपादक)