वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/532929.html
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नांना हिंदूंनी जागृत राहून वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
२. हिंदूंनी प्रत्येक घटनेकडे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने कृती करायला शिकले पाहिजे !
श्री गणेशमूर्ती विसर्जन आले की, प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा सर्वच सण असो, त्यांना जलप्रदूषण दिसते. जणू जगातील सर्व ठिकाणच्या प्रदूषणाला हिंदूंनी वर्षातून एकदा विसर्जन केलेले काही टनांचे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पाने-फुलेच उत्तरदायी आहेत ! क्रूर विनोद हा की, प्रदूषण नियंत्रण मंडळ एरव्ही घोरत पडलेले असते. विसर्जनाच्या नावाने कोल्हेकुई करणारे वर्षभर काहीच करत नाहीत; पण त्यांचा आवाज मोठा असतो. आम्ही त्यांना प्रतिप्रश्न विचारत नाही; कारण हिंदूंना त्यांच्या सीमारेषा सांभाळायची सवय आहे. इतरांसारखे आक्रमण करून प्रदेश व्यापायची नव्हे ! अशा वेळी आम्ही (हिंदू) गोंधळून जातो; कारण आमचे प्रश्न दबून विचारले जातात आणि त्यांची उत्तरे मात्र एका सुरात चारही दिशांनी दिली जातात. गोंधळ त्यांचा असतो आणि गोंधळून मात्र आम्ही जातो. कदाचित् सामान्य हिंदूंची अभिमन्यूसारखी गत होत असावी ! ज्याला चक्रव्यूह भेदण्याची कला अवगत नसते आणि सगळीकडून महारथींची आक्रमणे होतात. असे असले तरी जयद्रथाला सूर्य दिसणारच आहे. त्याचे मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडून वधाचा सूडही उगवला जाणारच आहे. मग आपण काय केले पाहिजे ? हे पालटण्यासाठी हिंदूंनी प्रत्येक घटनेकडे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने कृती करायला शिकले पाहिजे, तरच आपण खरे हिंदू होऊ !
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)