देशातील शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था दर्शवणारे एक प्रातिनिधिक उदाहरण !
‘एकदा गोव्यातील शैक्षणिक कार्यक्रमासाठी देशभरातील विद्यापिठांचे कुलगुरु आणि शिक्षणसंस्थांचे संचालक मिळून ७५ ते ८० जण उपस्थित होते. या सर्वांनी गोव्यात आल्यानंतर समुद्रकिनारी जाण्यास प्राधान्य दिले; मात्र यापैकी कुणीही गोव्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी गेले नाही, असे एका हितचिंतकांकडून समजले.
देशाचे भवितव्य असणारे विद्यार्थी घडवणार्या शिक्षणक्षेत्रातील नेतृत्वच (कुलगुरु आणि शिक्षणसंस्थांचे संचालक) असे असेल, तर भारत विश्वगुरु होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल,याची जाणीव झाली.’
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था आणि प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(गोव्यातील सत्ताप्राप्तीसाठी सवंग घोषणा करून मतदारांना भुलवणार्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी गोव्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करावेत, अशी धर्मप्रेमी गोमंतकियांची अपेक्षा आहे ! – संपादक)