गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांचा विरोध कायम !
हरियाणातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करता येणार नाही’, असे सांगूनही तेथे नमाजपठण चालू रहाणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
गुरुग्राम (हरियाणा) – येथे शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला गेले काही मास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. शुक्रवार, १७ डिसेंबरलाही हिंदु संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी नमाजपठण करणारे आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही दिल्या. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
‘डीएनए टेस्ट करवा लो… अब न होगी नमाज’: गुरुग्राम के पार्क में जुटे नमाजी, हिंदू संगठनों ने किया विरोध#GurugramNamaz #Haryanahttps://t.co/zOGFJgU5Tg
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 17, 2021