वणी परिसरात वाघांची दहशत !

वणी (यवतमाळ), १७ डिसेंबर (वार्ता.) – येथील घोंसा, कुंभारखणी, रासा, भालर, उकणी, कोलार-पिंप्री, मुर्धाेनी या भागांमध्ये वाघांची दहशत आहे. कोळसा खाणी असल्याने वाघांचा मुक्तसंचार आहे; मात्र त्यांच्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाऊ शकत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. (प्रशासन आणि वनविभाग यांनी वाघांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकर्‍यांना साहाय्य करावे, ही अपेक्षा ! – संपादक)