‘हलाल’चा शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती

‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने दीपावली स्नेह-मीलन कार्यक्रम पार पडला !

बेळगाव, १७ डिसेंबर (वार्ता.) – सध्या ‘हलाल सर्टिफिकेट’ नावाची एक नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून निर्माण झालेला पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका आणि ‘हलाल’चा शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी केले.

प्रतिवर्षीप्रमाणे ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने दीपावली स्नेह-मीलन कार्यक्रम १२ डिसेंबर या दिवशी टिळकवाडी हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

अवश्य पहा : ‘हलाल सर्टिफिकेशन’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या कार्यक्रमाचा video पहा…

(सौजन्य : हिंदु जनजागृती समिती)

याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक आणि ‘आमंत्रण डेव्हलपर’चे संचालक श्री. सचिन कल्लिमनी, लेखा परीक्षक श्री. सुनील भिडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. विनायक मोरे यांनी सादर केलेल्या गीताने करण्यात आला. ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने श्री. महेश बेटगिरी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मुळगुंद यानी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सतीश उंडाळे यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित जनसमुदाय

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संदीप भिडे, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर, मल्लिकार्जुन कोकणी, लक्ष्मीकांत कोटगी, उमेश नायक, विजयकुमार, राजाराम कुडतुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.