देहली दंगलीमागील उद्देश हिंदूंमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचाच ! – देहली न्यायालय
|
नवी देहली – देहलीतील न्यायालयाने वर्ष २०२० मध्ये देहलीमध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. न्यायालयाने या वेळी मान्य केले की, या दंगलीचा मुख्य उद्देश हिंदूंमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचा होता.
‘Aim was to create fear in minds of the Hindus’, Delhi Court frames charges against Shahnawaz, Shoaib and 8 others in Delhi anti-Hindu riotshttps://t.co/bGSyQCTDl5
— OpIndia.com (@OpIndia_com) December 16, 2021
तसेच हिंदूंना देश सोडून जाण्याची धमकी देणे, त्यांची संपत्ती लुटणे आणि जाळणे, हेही उद्देश होते. या प्रकरणी महंमद शाहनवाज, महंमद शोएब, शाहरुख, राशिद, आझाद, अशरफ अली, परवेज, महंमद फैजल, राशिद उपाख्य मोनू आणि महंमद ताहिर हे प्रमुख आरोपी आहेत.