पाकिस्तान दिवाळखोर देश झाला आहे !
पाकच्या महसूल मंडळाचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांचा घरचा अहेर !
कराची (पाकिस्तान) – पाकच्या महसूल मंडळाचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी ‘पाकिस्तान दिवाळखोर देश झाला आहे. कोणत्याही भ्रमात रहाण्यापेक्षा वस्तूस्थिती ओळखली पाहिजे’, असे म्हटले आहे. झैदी यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पावरही टीका केली. ते एका विश्वविद्यालयातील संमेलनामध्ये बोलत होते.
#Pakistan Has Gone #Bankrupt, Claims Former Revenue Chief Of Pakistan #ShabbarZaidihttps://t.co/zqzuickgha
— ABP LIVE (@abplivenews) December 17, 2021
१. झैदी म्हणाले की, मीही अद्याप चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग नेमका काय आहे, हे पूर्णपणे समजू शकलेलो नाही. सरकारमधील प्रत्येक जण सांगत आहे की, सर्वकाही चांगले आहे.
२. पाकने चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामुळे एका पाकिस्तानी नागरिकावर ७५ सहस्र रुपये कर्ज झाले आहे.