पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात दत्तजयंती उत्सव
पिंगुळी – प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या येथील श्री दत्तमंदिरात १८ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पहाटे ५ ते ६ काकड आरती आणि भूपाळ्या, ६ ते ७ श्रींची पाद्यपूजा, ७ ते १० प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर आणि श्री दत्तमंदिर येथे अभिषेक, सकाळी १० ते ११ प.पू. अण्णा महाराज समाधी मंदिरात अभिषेक, दुपारी १२ ते १ प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज आणि दत्तगुरुंची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ४ नामस्मरण, ४ ते सायंकाळी ६ श्री. प.पू. राऊळ महाराज महिला भजन मंडळाचे भजन, ६ ते रात्री ७ श्री दत्त जन्मसोहळा, ७ ते ८ सांजआरती, ८ ते १० प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांच्या पादुका आणि श्री दत्तगुरुंची पालखी मिरवणूक, रात्री ८ ते १० महाप्रसाद आणि रात्री १० वाजता प.पू. राऊळ महाराज भजन मंडळाचे भजन, असे कार्यक्रम होणार आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने शासनाचे नियम पाळून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, पिंगुळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.