‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या नामजपाचा भावार्थ
‘श्री’ म्हणजे लक्ष्मी आणि ती ज्याच्या पायाशी आहे तो ‘श्रीपाद’. ‘श्रीपाद वल्लभ’ म्हणजे लक्ष्मी त्याच्या पायाशी असून तो लक्ष्मीचा स्वामी आहे, असा (श्रीविष्णु). ‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ दोन वेळा होणारा निर्गुणरूपी दिगंबराचा उच्चार हा निर्गुणातून उत्पन्न होणारी अन् द्वैत दर्शवणारी ‘श्रीपाद’ आणि ‘वल्लभ’ ही दोन रूपे प्रकट करून परत एकत्वात म्हणजेच दिगंबररूपी अद्वैतात जातो.’ – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ नावानेही लिखाण करतात.)