बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे पुजार्याची हत्या करणार्या धर्मांधाला अटक
पुजारी काढून देत असलेला सट्ट्याचा क्रमांक जिंकण्यास योग्य न ठरल्याने हत्या
अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !
बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे १० डिसेंबरला रात्री जयमहाकाली मंदिराचे पुजारी रामदास (वय ६० वर्षे) यांची हत्या झाली होती. पोलिसांनी महंमद झिशान याला या हत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.
पुलिस ने दबोच लिया काली मंदिर के पुजारी के हत्यारे मोहम्मद जीशान को… क्रूरतम तरीके से मार डाला था पुजारी को
https://t.co/8VfBY0D6bu— Sudarshan News (@SudarshanNewsTV) December 15, 2021
पोलिसांनी सांगितले की, झिशान याने पुजार्याच्या हातून सट्ट्याचा क्रमांक काढला होता. सट्ट्यामध्ये जिंकण्यासाठी योग्य क्रमांक न मिळाल्याने अप्रसन्न होऊन त्याने पुजारी रामदास यांची हत्या केली. आरोपीने हत्या केल्याचे स्वीकारले आहे.
.@bijnorpolice स्वॉट टीम/थाना नांगल पुलिस द्वारा पुजारी हत्याकाण्ड का पर्दाफाश, घटना में संलिप्त अभियुक्त हत्या में प्रयुक्त लाठी सहित गिरफ्तार। #UPPolice pic.twitter.com/UEgNuSSyVy
— Bijnor Police (@bijnorpolice) December 14, 2021
यापूर्वी पुजार्याने काढलेल्या क्रमांकामुळे झिशान याला सट्टा लागला होता. त्यामुळे त्याने पुजार्याला भ्रमणभाष आणि पैसेही दिले होते; मात्र गेल्या काही काळापासून झिशान याला सट्ट्यामध्ये ४-५ लाख रुपयांची हानी झाली होती. हत्येच्या दिवशी त्यांच्यात भ्रमषभाषवरून याविषयी वादही झाला होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. काठीने मारहाण करून पुजारी रामदास यांची हत्या करण्यात आली.