(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’
एम्.आय.एम्.चे अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा प्रश्न
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? शौकत अली साहेब उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?’, असे प्रश्न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी एका चर्चेमध्ये बोलत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नूर बोलत होते.
AIMIM leader urges Muslims to have more children, asks ‘how else will Owaisi become PM?’ https://t.co/21uoyc50x4
— Republic (@republic) December 16, 2021
हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर नूर यांनी याविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, बलिदान करण्यात आमचे मोठे योगदान आहे; मात्र लोकसंख्येत आमचे प्रमाण अल्प आहे. (नूर कोणत्या बलिदानाविषयी बोलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे ! देशासाठी बलिदान केल्याची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही; मात्र गेली ३ दशके जिहादी आतंकवाद करण्यात मोठ्या संख्येने धर्मांध ठार होत आहेत, हे बलिदान ते म्हणत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ! – संपादक) ओवैसी साहेब पंतप्रधान व्हावेत, हे माझे वैयक्तिक मत आहे. ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होतील, याविषयी आम्ही चर्चा करत होतो. त्यात अयोग्य काहीच नव्हते.