उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात हिंदु असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या मुसलमान तरुणाला हिंदु मैत्रिणीसह अटक
हिंदूंच्या मंदिरात खोटारडेपणा करून प्रवेश करणार्यांना आजन्म कारागृहात डांबा ! – संपादक
उज्जैन (मध्यप्रदेश) – देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या येथील महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरतीच्या वेळी हिंदु तरुणीसमवेत एक मुसलमान तरुण हिंदू असल्याचे खोटे आधारकार्ड दाखवून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. मुसलमान तरुणाचे नाव युसूफ असून तो कर्नाटकातील रहाणार आहे. त्याच्याकडे ‘अभिषेक दुबे’ नावाचे खोटे आधारकार्ड सापडले. हिंदु तरुणीचे नाव खुशबू असून ती मुंबई येथे रहाणारी आहे.
Mumbai Muslim man held trying to enter Madhya Pradesh’s Mahakal temple as Hindu https://t.co/SA5xdezIhd
— TOI Cities (@TOICitiesNews) December 16, 2021