संभाजीनगर येथे लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र देणार्या ५ धर्मांधांना अटक
धर्मांधांची इतरांच्या जिवाशी खेळण्याची बेपर्वा आणि गुन्हेगारी वृत्ती जाणा ! – संपादक
संभाजीनगर – येथे कोरोनाच्या संसर्गावरील लस न घेताच लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्या ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आधुनिक वैद्य शेख रझीउद्दीन फहीमउद्दीन, अबूबकर अल हमीद, हादी अल हमीद, मोहम्मद मुदस्सीर, मोहम्मद अशपाक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी लोकांकडून आधारकार्ड आणि भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन ते शिऊर आणि मनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका आढाव आणि शहेनाज शेख यांना देत होते. त्यानंतर या परिचारिका लस न घेता लस घेतल्याची नोंदणी करून खोटे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करून सहस्रो रुपयांना लोकांना देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.