‘ऑनलाईन’ परीक्षांचा पर्याय कायमस्वरूपी नसणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
पुणे – कोरोना महामारीमुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत; मात्र आपण हळूहळू ‘ऑफलाईन’ परीक्षांकडे आले पाहिजे. हीच राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी असल्याचा अपसमज करून घेतला असेल, तर तो चुकीचा असून ऑनलाईन परीक्षांचा पर्याय कायमस्वरूपी नसणार, अशी चेतावणी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.