ती ‘भगवती’च केवळ सत्य आहे !

भगवती ललिता अंबे

‘पाहिली का ही पर्स ?’ या पर्सला इतिहास आहे. माझ्या वडिलांनी मला ही पर्स दिली, त्या वेळी मी एक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी होतो. त्यात मी थोडेसे पैसे आणि आई-वडिलांचे छायाचित्र ठेवत होतो. मग मी युनिव्हर्सिटीला गेलो. आता पर्समध्ये मी स्वतःचे छायाचित्र ठेवू लागलो. आता मला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व (individuality) आले. आता माझा पेहराव आणि माझी उपस्थिती अधिक मोलाची होती. मग माझे लग्न झाले आणि माझ्या पर्समध्ये पत्नीचे छायाचित्र आले. मी पिता झालो. ‘व्हॉट ए जॉय’ (केवढा हा आनंद) ! पत्नीच्या छायाचित्राने मुलाच्या छायाचित्राकरता जागा करून दिली.’’

एकाएकी त्याच्या नेत्रात अश्रू तरळले. त्याचा आवाज थरथरू लागला. कंठ रूद्ध झाला. डोळे पुसत तो उद्गारला, ‘‘माझे आई-वडील २० वर्षांआधी मृत्यू पावले. पत्नी ५ वर्षापूर्वी गेली. माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न झाले. आता त्याचे करिअर आणि त्याचे कुटुंब. त्याला क्षणाचीही उसंत नाही. आता माझे उत्तर आयुष्य ! ज्याच्यावर मी प्रेम केले, जे माझे मानले, ते सगळे दूर दूर गेले आहेत. आता माझ्या पर्समध्ये श्रीचक्राचे छायाचित्र, ‘भगवती ललिता अंबे’चे चित्र आहे. भगवती मला कधीच सोडणार नाही. मी त्या भगवतीचा आधार विद्यार्थीदशेपासून का नाही घेतला ? ती भगवतीच केवळ सत्य आहे. बाकी सगळ्या विरत जाणार्‍या सावल्या !

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २००७)