(म्हणे) ‘आरक्षणावर मार्ग निघत नसेल, तर आंदोलन उभे राहील !’ – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री
मुंबई – पुढच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळेल. सर्व अधिकारी, सचिव यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हे सूत्र हातात घेणे आवश्यक आहे. इतर मागासवर्गियांच्या आरक्षणावर मार्ग निघत नसेल, तर आंदोलन उभे राहील, अशी चेतावणी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे दिली. या वेळी भुजबळ म्हणाले, ‘‘मागासवर्गीय आयोगाने जलद गतीने काम केले, तर इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण देणे शक्य आहे. कोणत्याही सरकारची चूक असली, तरी लोकांची काय चूक आहे ? आता आयोगाला सर्वांनी पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. आयोगासमवेत मीही चर्चा करणार आहे.’’