डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरील घातलेल्या बंदीची कारणे योग्य कि अयोग्य ठरवण्यासाठी लवादाची स्थापना
नवी देहली – देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन्. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एका लवादाची स्थापना करण्यात आली आहे. हा लवाद जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर घालण्यात आलेल्या बंदीची कारणे योग्य कि अयोग्य, हे जाणून घेणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर या लवादाची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेवर नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा अवैध कृत्यविरोधी कायद्याखाली बंदी घालण्यात आली होती.
Justice DN Patel Led UAPA Tribunal To Adjudicate Upon ‘Unlawful Association’ Status Of Zakir Naik’s Islamic Research Foundation @HMOIndia,@ISparshUpadhyay https://t.co/tIS1RoaIA1
— Live Law (@LiveLawIndia) December 15, 2021