जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील !
नगर येथील कोपरगावच्या बिरोबा महाराज यात्रेतील भाकीत
नगर – आगामी वर्षात ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी पाऊस पडेल. जनावरांच्या चार्यांची सोय होईल. पिवळ्या रंगाच्या वस्तूंना महागाई राहील, आषाढ मासात १५ दिवस अगोदर पाऊस लांबणार आहे. जगात माणसांवर आलेले संकट आणखी २ वर्षे राहील. जगाच्या कानाकोपर्यात आपत्ती येईल, असे भाकित भोजडे येथील देवाचे भक्त (भगत) रामदास मंचरे यांनी वर्तवले असल्याची माहिती कांतीलाल मैदड यांनी दिली. कोपरगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र उपाख्य बिरोबा महाराज यांच्या चंपाषष्ठीनिमित्त यात्रा साजरी केली जाते. त्यामध्ये ‘हे होईक’ म्हणजे भविष्य वर्तवण्याची प्रथा आहे. यात्रेची मिरवणूक झाल्यानंतर वीरभद्र महाराजांना साकडे घालून जाब विचारण्याची प्रथा आहे. त्याला उत्तर देतांना हे भाकीत केले जाते.