भारताचे मोगलस्तान टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
मुंबई – देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल. आमचा वंश नष्ट होईल. आम्ही हिंदु म्हणून मत दिले आहे. हिंदूंचे नेते म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांना निवडून दिले आहे. त्यामुळे हिंदूंचे संरक्षण करा. भारताचे मोगलस्तान होणे टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.