गोहत्या बंदी कायदा आणि गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा !
भाजपचे खासदार किरोडी लाल मीणा यांची राज्यसभेत मागणी
अशी मागणी का करावी लागते ? आतापर्यंत सरकारनेच गोहत्या बंदी कायदा आणि गायीला राष्ट्रीय पशू घोषित करणे आवश्यक होते, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
नवी देहली – भाजपचे खासदार किरोडी लाल मीणा यांनी राज्यसभेत गोहत्या रोखण्यासाठी कायदा करण्यासह गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी केली. मीणा म्हणाले की, सनातन धर्मात गायीची पूजा केली जाते. गाय भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून तिला मातेचा दर्जा आहे.
भारत की अमर संस्कृति में गो, गीता, गायत्री और गंगा का अनिर्वचनीय महत्त्व है। ये चारों वैदिक सनातन संस्कृति की आधार हैं। आज राज्यसभा में गाय को राष्ट्रीय पशु घोषित करने का मामला उठाया। ऐसा होने से निश्चित ही गो-संरक्षण का महत्त्वपूर्ण कार्य हो सकेगा।@narendramodi @blsanthosh pic.twitter.com/4NYlayiglk
— Dr.Kirodi Lal Meena (@DrKirodilalBJP) December 14, 2021