मुंबईमधील बारवर धाड टाकून पोलिसांनी केली १७ युवतींना अटक !
बारचा व्यवस्थापक, हिशेबनीस यांसह ३ जणांना अटक
मुंबई – अंधेरीतील दीपा बारवर धाड टाकून १७ बारबालांना पोलिसांनी अटक केली. १२ डिसेंबरला सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. या बारच्या तळघरातील एका गुप्त खोलीत या युवतींना ठेवण्यात आले होते. सलग १५ घंट्यांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांना या खोलीचा शोध लागला. एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी बारचा व्यवस्थापक, हिशेबनीस यांसह ३ जणांना अटक करण्यात आले आहे.