मुंबईमध्ये हिंदु महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्यानंतर जन्माला आलेल्या मुलाचे धर्मांधाकडून अपहरण !
हिंदु महिलांना फसवणार्या धर्मांधांची जिहादी मानसिकता ओळखा आणि धर्मांधांपासून दूर रहाण्यासाठी युवती आणि महिला यांचे प्रबोधन करा ! – संपादक
आईच्या तक्रारीनंतर धर्मांधाला अटक आणि जामिनावर सुटका !
मुंबई, १३ डिसेंबर (वार्ता.) – येथील एका २७ वर्षीय हिंदु महिलेशी जवळीक वाढवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्यातून जन्माला आलेल्या मुलाचे अपहरण करणार्या तस्लीम सिफतहुसैन खान (वय ६० वर्षे) याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने त्याची १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
ही महिला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ‘वेटर’ म्हणून काम करते. खान याच्या विरोधात या महिलेने १६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीनुसार १४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी खान याने घरी येऊन ७ मासाच्या मुलाला फिरायला नेतो, असे सांगितले. त्यानंतर खान मुलाला घेऊन आला नाही. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ३० नोव्हेंबर या दिवशी देहली येथील एका रेल्वेस्थानकावर खान याला पोलिसांनी अटक करून मुलाला त्याच्या आईकडे सोपवले.