‘माझेच गुरु श्रेष्ठ आहेत !’, असे म्हणणे हा शिष्याचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार होय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि त्यांचे या भूतलावरील कार्य निराळे असते. काही संत चमत्कार करून लोकांचा अध्यात्म आणि देव यांवरील विश्वास वाढवतात. काही संत लोकांच्या सांसारिक समस्यांचे निवारण करून त्यांना साधनेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देतात, तर काही संत साधकांकडून केवळ साधना करवून घेतात. याचा अर्थ संत प्रत्येक टप्प्याला अडकलेल्या जिवांना त्यांच्या टप्यातून पुढे घेऊन जात असतात; परंतु संतांच्या शिष्यांना ‘माझेच गुरु श्रेष्ठ आहेत !’, असे वाटते. हा त्या शिष्यांचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार आहे. स्थूलरूपाने संतांचे कार्य निराळे असले, तरी सर्व संतांच्या माध्यमांतून कार्यरत गुरुतत्त्व एकच असते. त्यामुळे प्रत्येक संत त्यांच्या जागी श्रेष्ठच असतात. त्यांची तुलना होऊच शकत नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.११.२०२१)