निमणी (सांगली) येथे संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली !
निमणी (जिल्हा सांगली), १२ डिसेंबर (वार्ता.) तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी, सैनिक यांना ११ डिसेंबर या दिवशी ‘जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने निमणी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनय सपकाळ, निमणीचे सरपंच विजय पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, माजी सैनिक यशवंत पाटील, भानुदास पाटील, अशोक कांबळे, उदय पाटील, सुधीर पाटील, शंकर राजमाने, जगन्नाथ पाटील, संजय देवकुळे, प्रवीण राजमाने, उदय सपकाळ, सोमनाथ पाटील उपस्थित होते.